Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदगाव : करोना बाधित महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

नांदगाव : करोना बाधित महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

नांदगाव । प्रतिनिधी

पहिल्या लॉक डाऊन पासून करोना मुक्त असलेल्या नांदगाव शहरात चौथ्या लॉक डाऊन च्या शेवटच्या टप्प्यात एक छपन्न वर्षीय महिला बाधित झाल्याने करोनानाने शिरकाव केला त्यातच शहर वासीयांसाठी चिंता वाढविणारी घटना असून आज आलेल्या चाचणी अवहालापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहरात बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अशा नऊ जणांचे  स्वॅब आणि शहरातील सहा संशयीतांचे  स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते .त्यापैकी आज तीन जणांचे अवहाला पॉझिटीव्ह आले आहे .यात ५९ वर्षीय दोन आणि ३७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

शहराच्या मध्यवस्तीत कोरोनाने शिरकाव केला असून शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.वरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व इतर व्यक्तीची चाचणी उद्या घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी सांगितले.

शहरातील परिसरात रुग्ण राहत असलेला परिसराची पाहणी करत रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून रुग्णाच्या निवासस्थान पासून तीनशे मीटर पर्येंत भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून पाचशे मीटर भाग हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सर्वत्र निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या