Sunday, April 27, 2025
Homeनाशिकयेवला येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; नामको हॉस्पिटलचे सहकार्य

येवला येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; नामको हॉस्पिटलचे सहकार्य

येवला। प्रतिनिधी

नाशिकच्या मातीतून अंकुरलेले एकमेव वृत्तपत्र दैनिक ‘देशदूत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरू झाले आहे. आज  दि.२८ रोजी येवला येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कला, वाणिज्य महाविद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.

- Advertisement -

‘देशदूत’ने सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिलांचे आरोग्य हा दुर्लक्षित विषय आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील २० ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

जिल्ह्यातील नामांकित नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून मौलिक मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, हाडांचे विकार, पाठ, कंबरदुखी या तपासण्या महोत्सवात केल्या जाणार आहेत.

येवला येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक शेफालीताई भुजबळ, बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, नगरसेविका सरोजिनी वखारे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बचत गटांची जत्रा
आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणीच बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
सामाजिक भान जपत ‘देशदूत’तर्फे. कला, वाणिज्य महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...