Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : चासमध्ये बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : चासमध्ये बिबट्या जेरबंद

वावी | वार्ताहर | Vavi

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) चास परिसररात (Chas Area) रविवार (दि. १९) रोजी बिबट्याला (Leopard) पकडण्यात वनविभागाला (Forest Department) यश आले होते. यानंतर पुन्हा एकदा एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रात्रीच्या अंधारात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात एक मादी बिबट्या जेरबंद झाला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील चास परिसर बिबट्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, रविवार (दि.१९) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला होता.तसेच याच परिसरात अजूनही एक बिबट्या मोकाट असल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) शेतीची कामे करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या तक्रारींची दखल घेत वनविभागाने दोन दिवसांपूर्वी शेतकरी गोरक्षनाथ मनोहर खैरनार यांच्या शेतातील गट नंबर १३५ मध्ये पिंजरा लावला होता.

YouTube video player

यानंतर आज (बुधवारी) एक मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यावेळी ही माहिती वनविभागाला कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मादी बिबट्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष इतके असून, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघेरे,वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नांदूरशिंगोटे महेश वाघ,वनरक्षक चास आकाश रुपवते,वनरक्षक नांदूर शिंगोटे फैजआली सय्यद,वन्यजीव बचाव पथक रोहित लोणारे, निखिल वैद्य यांच्यासह वन कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना (Citizen) रात्रीच्या वेळी बाहेर जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर स्थानिक ग्रामस्थ आता अधिक सतर्क झाले आहेत. तसेच वनविभागाने सतर्क राहून पथकाची परिसरात गस्त वाढवून शोधमोहीम राबविल्याने त्यांच्या कामाला यश प्राप्त झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.सदर जेरबंद झालेला बिबट्या हा महोदरी वनउद्यान सिन्नर येथे ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...