Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : पळसे परिसरात बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : पळसे परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या पळसे गावातील (Palse Village) शिवारात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास वनविभागाने (Forest Department) त्र्यंबक राणू गायधनी, ज्ञानेश्वर गायधनी, गणेश जाधव यांच्या मालकीचा गट नंबर ५९९ नाशिक सहकारी साखर कारखाना रोड या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसापासून या भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्याचप्रमाणे या बिबट्याने काही प्राण्यांची शिकार सुद्धा केली होती. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते, तर अनेक वेळा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये दिसलेला होता. परिणामी या भागात पिंजरा (Cage) लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

YouTube video player

त्यानंतर वनविभागाने या भागात पिंजरा लावला असता अखेर आज (सोमवारी) सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे नागरिकांना (Citizen) समजताच त्यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळाने वनविभागाचे कर्मचारी आले व पिंजऱ्यासह बिबट्याला घेऊन गेले.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...