Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik News: नाशिकच्या कामगार नगर परिसरात बिबट्याचा धुमाकुळ

Nashik News: नाशिकच्या कामगार नगर परिसरात बिबट्याचा धुमाकुळ

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील संत कबीरनगर – वनविहार कॉलनीजवळ बिबट्या आढळला आहे. दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या परिसरात दोन बिबटे असल्याचा परिसरातील नागरिकांनी दावा केला आहे. वनविभागाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत बिबट्याचा शोध सुरु आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीममधील एका जवानावर हल्ला केला असून यात जवान गंभीर जखमी झाले आहे. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे दाखल झाले असून ते या परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहे. गंगापूर रोड परिसर हा दाट नागरी वस्ती असलेला परिसर असून या भागात अचानक बिबट्या दाखल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तसेच वनविभागाकडून या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Sunil Kedar : “नगरसेवकपद सोन्याचे अंडे देणारी…”; भाजप शहराध्यक्षांनी थेट मुद्द्यालाच...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik यापूर्वीचे कामकाज पहाता काही नगरसेवकांनी नाशिकच्या (Nashik) नावाला व विकासाला गालबोट लागेल असे कामकाज केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे...