नायगाव | ज्ञानेश्वर काकड | Naigaon
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) नायगाव येथे शेतकऱ्याच्या (Farmer) शेतातील नारळाच्या झाडावर (Coconut Tree) चढून खेळ करत असल्याचे दिसून आले. तिला काही दिवसांपासून परिसरात बिबट्यांचे वास्तव्य बघायला मिळत असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या नारळावर चढताना व उतरतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
दिगंबर कातकाडे यांच्या शेतातील बांधावर काही नारळाचे झाडे आहेत. आज (दि. 10) सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कातकाडे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या नारळाच्या झाडावर बिबट्या चढताना दिसून आला. त्यांनी लगेचच बिबट्याचा हा खेळ आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळत असून परिसरात तीन बिबटे असल्याचे कातकडे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील खडांगळी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालक जखमी झाले होते. त्या दिवशी सायंकाळी पंचाळे येथे बहिणी सोबत लपाछपी खेळत असताना मकामध्ये लपलेल्या दहा वर्ष शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असून यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.




