Thursday, May 15, 2025
HomeनाशिकNashik News : शिवजयंतीसह मिरवणुकीनिमित्त गर्दी उसळणार; मुख्य रस्ते आज बंद

Nashik News : शिवजयंतीसह मिरवणुकीनिमित्त गर्दी उसळणार; मुख्य रस्ते आज बंद

वाहतूक शाखेचे नियोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज (दि. १९) जयंती असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातून मुख्य मिरवणुकीसह उपनगरीय परिसरातही मिरवणूक निघते. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहर वाहतूक पोलीस (City Traffic Police) शाखेतर्फे मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी जारी करून वाहनचालकांनी पर्यायी मागौचा बापर करावा, असे आवाहन केले आहे.

पंचवटी परिसर

शिवजयंती उत्सवानिमित्ताने बुधवारी (ता. १९) सकाळी १० ते मध्यरात्री १२ पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत.

बंद मार्ग : मालेगाव स्टँड, इंद्रकुंड पंचवटी कारंजा दिंडोरी नाका, मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टँडकडे दोन्ही मार्ग.

पर्यायी मार्ग : दिंडोरी नाका-पेठ नाका मखमलाबाद नाका-रामवाडी पूलमार्गे इतरत्र मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पूलमार्गे इतरत्र. तर ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र

मुख्य मिरवणूक (वाकडी बारव)

मुख्य मिरवणूक दुपारी १२ ते मध्यरात्री मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्ग बंद राहतील.

बंद मार्ग (मिरवणूक मार्ग) वाकडी बारव : महात्मा फुले मंडई-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल मेहेर सिप्रल-अशोकस्तंम-रविवार कारंजा-मालेगाव स्टैंड-पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामतीथीपर्यंत.

पर्यायी मार्ग : निमाणी व पंचवटी कारंजापासूनच्या सिटी लिंक बसेस पंचवटी डेपोतून सुटतील, रविवार कारंजा व अशोतस्तंभमार्गे जाणाऱ्या सिटी लिंक बसेस शालीमावरुन सुटतील. तसेच, सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

पाथर्डी फाटा परिसर

बंद मार्ग : गवारे टी पॉईंट ते पाथर्डी फाटा मार्गावरील अवजड वाहतूक, पाथर्डी गाव ते शिवाजी पुतळ्यासमोरुन अंबड-सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद

पर्यायी मार्ग : गरवारे पॉइंट येथील उड्डाणपूलावरून द्वारकाकडे, बोधले नगर सितालवरुन द्वारकापर्यंत व तेथून उड्डाण पूलावरुन गरवारे पॉइंटकडे. पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडवलेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसीमार्गे वाहने जातील.

नाशिकरोड परिसर

छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड़ आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक, दुपारी १२ ते मध्यरात्री १२ पर्यंत मिरवणूक मार्ग वाहतुकीला बंद, १८ ते २३ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते साडेदहा सांस्कृतिक कार्यक्रम

बंदमार्ग : बिटको चौक व सिन्नर फाटासह रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक बिटको चौकातून जेलरोडमार्गे व नांदूर नाकाकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक.

पर्यायी मार्ग : रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्ट कॉर्नर मार्गे रेल्वे स्टेशन. सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक, नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरुन आर्टिलरी रोडमार्गे जय भवानी चौकातून उपनगर सिालमार्गे जातील. पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील व येतील. बिटको चौकातून जेलरोडमार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार समोरील रस्त्यावरुन नारायणबापू नगरमार्गे टाकळीकडे जातील. नांदूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरुन एकेरी मार्गावर सुरू असेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...