मकर संक्रांति आणि महाकुंभ पर्व निमित्त नाशिकच्या गंगा घाट आणि रामकुंडावर सकाळी प्रचंड स्नानासाठी गर्दी झाली होती. परगावच्या अनेक बसेस या पार रामसेतू पुलाच्या पटांगणापर्यंत पार्किंगमध्ये होत्या.

आज मकर संक्रांत उत्पन्न उत्तर नारायण सुरू झाल्याने तसेच प्रयागराज येथे महाकुंभ पर्व सुरू असल्याने नाशिकच्या गोदावरी तीरी सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे. नाशिकला कुंभमेळा हा 2027 साली असला तरी आज स्नानासाठी लोकांनी गोदावरी तरी प्रचंड गर्दी केली.
- Advertisement -

गोदावरीला गंगेची बहीण मानले जाते आणि गोदावरी तरी नद्यांचा संगम असल्याकारणाने इथे पवित्र स्नान मानले जाते.