नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात (Tapovan Tree Cutting) आज (दि.०८ डिसेंबर) रोजी
नाशिक महापालिकेत (Nashik NMC) आयुक्त मनीषा खत्री यांनी पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांची बैठक बोलावली होती. मात्र आजच्या या बैठकीत तपोवनातील वृक्षतोडीवर कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर महापालिका आयुक्त खत्री यांनी माध्यमांशी सवांद साधला.
यावेळी त्या म्हणाल्या की, आज तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात पर्यावरणप्रेमी आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस काही पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. तर अजूनही काही पर्यावरणप्रेमीसोबत बैठक घेतली जाणार आहे. बैठकीत काही गोष्टींवर चर्चा झाली. यात साधूग्रामसाठी झाडे तोडणे हे काही लोकांना मान्य आहे तर काही लोकांना अमान्य आहे. आजच्या बैठकीचे व्हिडीओ शूटिंग देखील करण्यात आले असून, आता सर्व झाडांचा सर्व्हे झाला आहे. तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा सर्व्हे अदयाप बाकी आहे, असे मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, जुने झाडे (Tree) काढली जाणार नाही. वृक्ष प्राधिकरणाची बैठक होईल, त्यानंतर किती झाडे तोडली जातील याचा आकडा सांगण्यात येईल. गेल्या कुंभमेळ्यामध्ये तीन शेड उभे केले होते. आता देखील टेंट उभे करावेच लागणार आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही जागा खरेदी केलेली आहे. इथे रिक्रियेशन सेंटर उभे करायचे, असा निर्णय मनपाच्या सर्वसाधारण सभेत झाला होता.२०१६ च्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. अकरा वर्ष जागेचा वापर करावा. नंतर एक वर्ष ती जागा कुंभमेळ्यासाठी वापरली जाणार असा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती आयुक्त खत्री यांनी दिली.




