Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News: 'मेघदूत' ने दिला जुन्या आठवणींना उजाळा; बाळासाहेब देशमुखांच्या नातवाची अशीही...

Nashik News: ‘मेघदूत’ ने दिला जुन्या आठवणींना उजाळा; बाळासाहेब देशमुखांच्या नातवाची अशीही भरारी

नाशिकरोड | प्रतिनिधी
ज्या बंगल्यात जन्म झाला, त्याचबगल्यात तब्बल सहा दशकांनंतर कॅबिनेट मंत्री म्हणून गृहप्रवेश करण्याचे अनोखे भाग्य देवळालीचे माजी आमदार, खासदार दिवंगत बाळासाहेब देशमुख यांचे नातू व विद्यमान पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना लाभले. गृहप्रवेशावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी व समस्त कुटुंबियांना गहिवरून आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षनिरपेक्ष मैत्रीची अनेक उदाहरणे प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या मैत्रीने एक वेगळाच आदर्श घालून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य गेले काही दिवस मुंबई येथील शासकीय निवासस्थान असलेल्या ‘सागर’ आणि ‘मेघदूत’ या ठिकाणी होते. अलीकडेच ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राहण्यास गेले. त्यामुळे त्यांच्याकडील मेघदूत हे शासकीय निवासस्थान रिक्त झाले. निवासस्थान तुम्ही सोडणार असाल तर ते मला मिळावे, अशी विनंती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी शंभूराजे यांना ते मिळण्याची खबरदारी घेतली.

- Advertisement -

या सहकार्यामुळे देसाई यांना ‘मेघदूत’ मिळाला. या निवासस्थानाशी देसाई व त्यांच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. विशेष म्हणजे याच बंगल्यात शंभूराज देसाई यांचा १९६६ साली जन्म झाला होता. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई हे शंभूराज यांचे आजोबा, देसाई शंभूराज यांचे आजोबा, हे मातूल आजोबा. तेदेखील नंतर देवळाली मतदारसंघाचे आमदार होते. आजोबांया च्या प्रेमळ सहवासात शंभूराज देसाई यांचे बालपण याच बंगल्यात गेले. त्यामुळे देसाई कुटुंबाच्या भावविश्वात या वास्तूला महत्त्वाचे स्थान आहे.

YouTube video player

मेघदूत बंगल्यात गृहप्रवेशावेळी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वाने मातोश्री विजयादेवी देसाई यांना गहिवरून आले. शंभूराज देसाई यांचाही अश्रूचा बांध फुटला. मायलेकांच्या आसवात ‘मेघदूत’ चिंब चिंब भिजला. देसाई घराणे आणि मेघदूत बंगला यांचे नाते अनोखे होते. या कुटुंबाचा सुवर्णकाळ मेघदूत बंगल्याने पाहिलेला असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने संपूर्ण देसाई कुटुंब भावनिक झाले. देवळाली गावाचे नगराध्यक्ष, आमदार व नंतर राज्यसभेचे खासदार अशी देदीप्यमान राजकीय कारकीर्द गाजवणारे शं. ना. उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या विजयादेवी या ज्येष्ठ कन्या, शंभुराज हे विजयादेवींचे ज्येष्ठ चिरंजीव. आपला जेथे जन्म झाला व जेथे आजोबांच्या कार्यकर्तृवाची पताका झळकली, अशा मेघदूत बंगल्यावर पुन्हा एकदा राहण्यास मिळणे हा मोठ्या भाग्याचा क्षण असल्याची भावना देसाईंनी व्यक्त केली.

नाशिकला गेलेले बालपण आणि तेथेही आजोबांच्या करारी स्वभावात झालेले भरणपोषण याची शंभूराज देसाई यांनी आवर्जून आठवण काढली. याचदिवशी विजयादेवींचाही वाढदिवस असल्याने हा दुग्धशर्करा योग साधून देसाई कुटुंबियांनी गृहप्रवेशाची संधी घेतली. याप्रसंगी शंभुराज यांच्या मातोश्री विजयादेवी, बंधू रविराज, पत्नी स्मितादेवी, चिरंजीव व पाटण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज, कन्या ईश्वरी, आतेबहीण गीतांजली हिरे, पुतणे जयराज, आदित्य तसेच मावसबहीण अॅड, चैत्राली देशमुख आदी कुटुंबीय या क्षणाचे साक्षीदार होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...