Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News: न्यायालयाच्या दारी हाणामारी; दोन कुटुंबातील महिला-पुरुष भिडले, सासू-सुनेचा वाद विकोपाला

Nashik News: न्यायालयाच्या दारी हाणामारी; दोन कुटुंबातील महिला-पुरुष भिडले, सासू-सुनेचा वाद विकोपाला

नाशिक | प्रतिनिधी
न्यायालयीन तारखेनिमित्त आमनेसामने आलेल्या सासू-सुनेमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी घडली. न्यायालयाच्या दारीच ही हाणामारी झाल्याने सर्वच बुचकळ्यात पडले. विशेष म्हणजे महिला व पुरुषांच्या या जबर राड्यात प्रथम उपस्थितांसह काही महिला पोलीस व वकीलांनी बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानून वाद सोडविण्याचा किंचितसाही प्रयत्न केला नाही. एकमेकांना मारुन झोडून झाल्याने दोन्ही गटांची शक्ती क्षीण झाली. त्यानंतर काहींनी मध्यस्थी करुन हा वाद सोडवून सरकारवाडा पोलिसांना कॉल केला.


सासू, सुनेच्या नात्यात वाद होणे सामान्य बाब असल्याचे सुज्ञ सांगतात. मात्र, सामान्य वाटणारा हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो, याची प्रचिती या घटनेतून आली. अखेर पोलिसांनाच या वादात उडी घेत, दोघींवर कारवाई केली.

- Advertisement -
न्यायालयाच्या दारी हाणामारी; दोन कुटुंबातील महिला-पुरुष भिडले

प्रकरणातील सासू आणि सुनेमध्ये पटतच नसल्याने, प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. दुसऱ्या तारखेसाठी जेव्हा सासू आणि सून न्यायालयात आले, तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली. सासू यमूना यशवंत निकम (५८, पिंपळपट्टी, जेलरोड) आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे (३७, रा. धुळगाव, महिरावणी) यांच्यात शाब्दीक चकमक झाली. बघता बघता, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष भिडले. उपस्थितांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला.

मात्र, दोन्ही गट इतके आक्रमक होते की, मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधितांना मेमो देण्यात आले. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडल्याने, न्यायालय आवारात दिवसभर चर्चा होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...