Friday, August 21, 2026
HomeनाशिकNashik Potholes News : सात दिवसांत शहर खड्डेमुक्त करा, अन्यथा...; मंत्री महाजनांचा...

Nashik Potholes News : सात दिवसांत शहर खड्डेमुक्त करा, अन्यथा…; मंत्री महाजनांचा अधिकाऱ्यांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांसोबत नागरिकांच्या (Citizen) सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच शहरातील खड्डे सात दिवसांत बुजविण्याचा अल्टिमेटम जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी दिला. मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

दरम्यान, महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे, उपायुक्त साताळकर, पोलीस लक्ष्मीकांत साताव्ळ उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik News : खड्ड्यांवरून मंत्र्यांमध्ये जुंपली; भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला महाजनांचे जशास तसं उत्तर, म्हणाले “मी नाशिकमध्ये नेहमी…”

यावेळी महाजन म्हणाले की, सिंहस्थपूर्व रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन, फायबर केबल, ड्रेनेज व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी कामांच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. सुरक्षेतील कोणतीही त्रुटी तातडीने दूर करून अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता केले. घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट

अंबड व सातपूर एमआयडीसीतील (Ambad and Satpur MIDC) रस्त्यांची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. खड्डे बुजविताना मुरूम किंवा मातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या. ठेकेदार मनमानी करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत, कामे करताना कोणाचीही वाट पाहू नका; शासनस्तरावर आवश्यक ती मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Traffic News : मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल; ‘हे’ मार्ग असणार बंद

आजपासून खड्डे दुरुस्ती मोहीम

महापौरांनी शनिवारपासून शहरभर विशेष खड्डे दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. आयुक्त मनीषा खत्री यांनी निकृष्ट कामांबद्दल संबंधित ठेकेदारांवर आतापर्यंत सहा कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली. तसेच एमएनजीएलकडून पूर्वपरवानगीशिवाय रस्ते खोदले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बैठकीसाठी बोलाविण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 54 स्टोन क्रशर सील; गौण खनिज माफियांना दणका

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि अनधिकृत स्टोन क्रशरविरोधात महसूल प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळ अंदाज समितीच्या जिल्हा दौर्‍यादरम्यान...