Wednesday, September 23, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : खड्ड्यांवरून मंत्र्यांमध्ये जुंपली; भुजबळांच्या 'त्या' टीकेला महाजनांचे जशास तसं...

Nashik News : खड्ड्यांवरून मंत्र्यांमध्ये जुंपली; भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला महाजनांचे जशास तसं उत्तर, म्हणाले “मी नाशिकमध्ये नेहमी…”

नाशिक | Nashik

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे (Potholes) नागरिकांचा (Citizen) जीव धोक्यात येत असल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) मांडणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत (Death) झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत मिळावी, अशी मागणी करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, असा इशारा दिला. भुजबळांच्या या टीकेवर उत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला.

महाजन म्हणाले, पालकमंत्री (Minister) असो वा नसो, मी नाशिकमध्ये नेहमी हजर असतो. येत्या सहा महिन्यांत नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि सर्व कामे पूर्ण होतील. खड्डे बुजवण्यासाठी पैसे आणि परवानगीची चिंता करू नका, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ३०-३५ टक्के बिलो टेंडर घेणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाईचा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट स्पॉटवर राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह एकास अटक;...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितास (Suspected) पोलिसांनी सापळा रचून अटक...