Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : आमदार देवयानी फरांदेंचा कॅफेवर छापा; नको 'त्या' अवस्थेत आढळले...

Nashik News : आमदार देवयानी फरांदेंचा कॅफेवर छापा; नको ‘त्या’ अवस्थेत आढळले युवक-युवती

नाशिक | Nashik

शहरातील गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road Area) एका कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्याबाबत आवश्यक ती कारवाई (Action) केली जात नव्हती. त्यामुळे भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी आज (दि.०१ मार्च) रोजी मोगली कॅफेवर धाड टाकून दिवसाढवळ्या सुरू असणारे अनैतिक व अश्लील कृत्य करणाऱ्या युवक युवतींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

याबाबत माध्यमांशी बोलतांना आमदार फरांदे म्हणाल्या की,”नाशिक शहराचा (Nashik City) एक सांस्कृतिक वारसा असून जाणीवपूर्वक नाशिकचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कॅफे तयार करण्यात आलेले असून या कॅफेंचे बांधकाम अनाधिकृतरित्या करण्यात आलेले आहे. या कॅफेंकडे पोलीस प्रशासनासह महानगरपालिकेच्या प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असून यामुळे तरुण पिढी बिघडत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या कॅफेंवर कारवाई करावी अशी मागणी मी वारंवार केलेली होती. परंतु, पोलीस प्रशासनाकडून याबाबत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाशिकचे सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी गंगापूररोड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी धाड टाकून अश्लील कामकाज करणाऱ्या युवक युवतींना पोलिसांच्या स्वाधीन केले”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे त्या म्हणाल्या की,” या ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती महानगरपालिका प्रशासनाला देखील देण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकेने (Police Administration and Municipal Corporation) याबाबत तत्काळ कारवाई करून कॅफेमध्ये सुरू असलेले अनाधिकृत व अश्लील कामकाज बंद करावे व नाशिकचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी मदत करावी. तसेच याबाबत तत्काळ कारवाई करण्यात न आल्यास नाशिक शहरात इतर ठिकाणी जाऊन देखील कॅफे बंद करण्याचे काम करावे लागेल”, असा इशाराही आमदार फरांदे यांनी यावेळी दिला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी मतदारांचे योगदान महत्त्वाचे – जीवने

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे...