Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात उपनगरला 'TV फोडो' आंदोलन

Nashik News : भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात उपनगरला ‘TV फोडो’ आंदोलन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road  

भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात (India-Pakistan Match) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाने यांच्या नेतृत्वाखाली उपनगर (Upnagar) येथे टीव्ही फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी टीव्ही फोडून सरकारचा (Government) केला निषेध करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या.

- Advertisement -

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही (Pahalgam Attack) केंद्र सरकारने (Central Government) पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला परवानगी दिली. त्यामुळे देशभरात विरोधकांकडून निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सामन्यावरुन गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे पुत्र आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

YouTube video player

आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आहेत. उभय संघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर दोन्ही संघांत पहिल्यांदाच टक्कर होणार आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणताच संबंध ठेऊ नये, अशी तीव्र भावना देशवासियांची आहे.

मात्र, त्यानंतरही भारत सरकारच्या (Central Government) क्रीडा मंत्रायलाने या सामन्याला परवानगी दिली. त्यामुळे हा सामना होत असून, देशवासियांचा या सामन्याला तीव्र विरोध आहे. यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात अनेक संघटना आणि विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे.

दरम्यान, यावेळी शहरचिटणीस अभिषेक गुरव, विभाग उपाध्यक्ष राहुल पाटील, प्रकाश बोधवानी,अनिल देठे, विल्यम कॉक्स, अमोल गुरव,अनिल गांगुर्डे,नाना सहाणे, प्रथम पाटील,कृष्णा बरके, ललित पागेरे,जतीन कोकणे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...