नाशिक | Nashik
अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या राष्ट्रीय व्यावसायिक संस्थेतर्फे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक (मविप्र) यांना ‘भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था-२०२५’ हा मानाचा पुरस्कार (Award) शनिवार दि.२९ नोव्हेंबर रोजी पुद्दुचेरी (पाँडिचेरी) येथील शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. मविप्रचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
पुद्दुचेरी येथील श्री मनकुला विनायगर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ५५ व्या आयएसटीई राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयएसटीई (ISTE) ही अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची एकमेव राष्ट्रीय संस्था असून, देशभरातील संस्थांचे सखोल मूल्यमापन करून हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे (Nitin Thackeray) सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक अॅड. संदीप गुळवे, रमेश पिंगळे, अॅड. लक्ष्मण लांडगे, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश आर. देवणे, मविप्र आरएसएम पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रशांत एन. पाटील उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी ‘आयएसटीई’चे आभार मानले.
दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री व माजी पोलिस आयुक्त-मुंबई सत्यपाल सिंह, एसएमव्हीई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एम. धनशेखरन, आयएसटीईचे चेअरमन डॉ. प्रतापसिंह के. देसाई, आयएसटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. एस. जयकुमार, आयएसटीईचे कार्यकारी सचिव डॉ. येर्रा रामा मोहन राव, एसएमव्हीईसीचे परीक्षा नियंत्रक डॉ. एस. अंबुमलार, एसएमव्हीईसीचे अकॅडेमिक्स डीन डॉ. के. वेल्मुरुगन, एसएमव्हीईसी रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डॉ. ए. ए. अरिवळागर, एसएमव्हीईसी अकॅडेमिक्स डीन डॉ. एन. एस. एन कैलाससामे, एसएमव्हीईसी प्लेसमेंट डीन डॉ. एस. मुथुलक्ष्मी, एसएमव्हीईसी एसएएस डीन डॉ. एस. एम. अली, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. एस. मलार्क्कन, एमईसी विल्लुपुरम संचालक डॉ. एस. सेंथिल या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.




