नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिका व पोलिसांनी (Nashik NMC and Police) रविवार (दि.१५) रोजी संयुक्त कारवाई करुन द्वारका परिसरातील (Dwarka Area) अतिक्रमण काढण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आता ही कारवाई तिसऱ्या दिवशी देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज (मंगळवार दि.१७) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (Encroachment Department) मोठ्या पोलीस बंदोबस्तात द्वारका, काठे गल्ली सिग्नल, सारडा सर्कल, गंजमाळसह आदी भागांत सलग तिसऱ्या दिवशी देखील अतिक्रमण हटविले. अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे आणि पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
दरम्यान, आतापर्यंत लहान मोठे सुमारे ५० पेक्षा जास्त टपऱ्या व हातगाडे तसेच दुकानांवर (Shop) हातोडा चालला आहे. तर काही ठिकाणी नागरिकांनी (Citizen) या अतिक्रमण मोहीमेला विरोध दर्शविला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मोहीम नियमित सुरू ठेवली.




