Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : नववर्ष जल्लोषाला पहाटेपर्यंत परवानगी; एक्साईज-पोलीस यंत्रणा सज्ज

Nashik News : नववर्ष जल्लोषाला पहाटेपर्यंत परवानगी; एक्साईज-पोलीस यंत्रणा सज्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) करण्यासाठी तरुणाईसह नाशिककरांमध्ये (Nashik) उत्साह संचारला आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत नववर्ष सेलिब्रेशनसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी कडक अटी-शर्थी लागू करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

एकीकडे उत्सवाचे वातावरण असताना, दुसरीकडे महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहर व ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभाग सज्ज आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यतस्करी होण्याची शक्यता गृहित धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी केली आहे. परराज्यातून नाशिकमार्गे होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके तैनात असून, गस्तीत बाढ करण्यात आली आहे.

YouTube video player

एक्साईजचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या आदेशानु‌सार इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह संवेदनशील भागांतील रिसॉर्ट, फार्महाऊस व हॉटेल्सची तपासणी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नववर्ष सेलिब्रेशनसाठी परवानाधारक वाईन शॉपला मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीची, तर परमिट बिअरबारला पहाटे ५ वाजेपर्यंत सेलिब्रेशनची परवानगी देण्यात आली आहे. मद्यपानासाठी नागरिकांना ऑनलाईन तसेच एकदिवसीय परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. परवाना नसलेल्या मद्यपींवर एक्साईज व पोलिसांकडून (Police) संयुक्त कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या (NMC Election) अनुषंगाने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर आयुक्तालय हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण भागात अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौक, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट परिसर, फार्महाऊस, हॉटेल्स व पार्टी स्थळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गुन्हे शाखेची पथके पार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या वापरावर विशेष लक्ष ठेवणार आहेत. मद्यपी, टवाळखोर, धिंगाणा करणारे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे नोंदविण्याचे आदेश आहेत. रात्री १२ ते पहाटे ४ वाजेदरम्यान गस्तीवरील पथकांकडून वाहनांची कसून तपासणी केली जाणार असून, संशयास्पद वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

अचानक तपासणी

नववर्ष सेलिब्रेशनच्या अनुषंगाने मद्यविक्रीला मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर परमिट बिअरबारला पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. पार्टीसाठी आवश्यक परवाने घ्यावेत.

संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज)

मुद्दे

वाईन शॉपला मद्यविक्री मध्यरात्री १ वाजेपर्यंत
परमिट बिअरबार पहाटे ५ वाजेपर्यंत सेलिब्रेशन
मद्यपानासाठी एकदिवसीय परवाना उपलब्ध
परवाना ऑनलाईनही मिळणार
अर्जासाठी पोर्टल: https://
exciseservices.mahaonline.gov.in/Home/Portal
क्लब, परमिट रूम, बिअर बार यांना ठराविक अटी लागू
नियमभंग करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई
अनुज्ञप्तीधारकांना आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...