पेठ | प्रतिनिधी | Peth
पेठ नगरपंचायतीच्या (Peth Nagarpanchyat) उपनगराध्यक्षा अफरोजा शेख यांच्याविरोधात अविश्वास ठराव (No Confidence Motion) मंजूर झाल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. उपनगराध्यक्षा अफरोजा शेख यांनी आपला प्रभाग सोडून इतरांच्या प्रभागामधील कामात तस्तक्षेप करीत असल्याचे कारणावरून नगरसेवक गौरव गावित व इतर ८ नगरसेवकांनी दि. १३ मे रोजी अविश्वास दर्शवून त्यावर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती.
काल आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत अविश्वासाचा मुद्यावर नगराध्यक्ष करण करवंदे यांनी ठरावावर मतदान (Voting) घेतले. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी नागेश येवले, कार्यालय अधिक्षक उपस्थित होते. अविश्वास ठरावाचे बाजूने १२ मते तर अविश्वासाचे विरुद्ध ३ मते पडली. उपनगराध्यक्ष यांचा माकपचा गट त्यांच्या बाजूने राहिल्याने त्यांचीच मते पडली. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दोन्ही नगरसेवक (Corporater) यांनी तटस्थ भूमीका घेतल्याने अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याने उपनगराध्यक्षा अफरोजा शेख यांना पायउतार व्हावे लागले आहे.
मी कुणाच्याही प्रभागात घुसखोरी न करता विकासकामे गुणवत्तापूर्वक होण्यावर भर देण्यात आला. मात्र त्यांना माझ्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप असल्याची कुठलीही तक्रार नव्हती. मात्र, या सर्व घडामोडीतही माझे माकप गटाचे तीनही सदस्य एकसंघ राहिले. नागरीकांना कुठलाही आक्षेप नसतांना माझ्यावर अविश्वास दाखविणे ही राजकीय झुंडशाही आहे.
अफरोजा शेख, उपनगराध्यक्षा पेठ