Saturday, September 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पठावे धरण ओव्हरफ्लो

Nashik News : पठावे धरण ओव्हरफ्लो

- Advertisement -

मुंजवाड । वार्ताहर Munjvad

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पठावे धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे हत्ती नदी प्रवाहीत झाल्याने नदी काठावरील गावांना विशेषत: शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे हरणबारी धरणात 720 द.ल.घ.फुट सुमारे 61.75 टक्के पाणीसाठा तर केळझर 48.25 व दसाणे धरण 79 टक्के भरले आहे. तालुक्यात रूसलेल्या पावसाने दोन-तीन दिवस सुरु असलेल्या संततधारेमुळे धरणातील जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याबरोबरच खरीप पिकांचे दुबार पेरणीचे संकट टळले असल्याचे दिसून येत आहे.

रिमझिम बरसणार्‍या पावसाने दुबार पेरणीचे संकट काही दिवसांपुरता टाळले असले तरी चांगले उत्पादन निघण्यासाठी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली पाहिजे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या