नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) असलेल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी (Mahayuti Candidate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ८ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरात सभा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंचवटीतील तपोवन येथील मैदानाची चाचपणी सुरू असून पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना ‘अलर्ट’ झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळी पाठोपाठ शहर पोलिसांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासह सभेसंदर्भातील बंदोबस्ताच्या नियोजनाला सुरूवात केली आहे. लवकरच पीएमओकडून अधिकृत दाैरा येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात असलेल्या महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. या प्रचारात ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येऊ शकतात. त्यासाठी तपोवन येथील जागेची चाचपणी सुरु आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सभास्थळांची पाहणी केल्यानंतर पोलिसांच्या विशेष शाखेनेही त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु केली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत
नाशिक शहर पोलिसांनीही (Nashik City Police) यासंदर्भातील गोपनीय माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस देखील प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत पोलिस बंदोबस्ताचे नियोजन हाती घेण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, यापूर्वी तपोवनातील मैदानावर मोदी यांची सभा झाली असून जवळच हेलिपॅड असल्याने सुरक्षा यंत्रणांना नियोजन करणे सोयीस्कर ठरते.त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
हे देखील वाचा : Nashik News : प्रॉडक्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याने लाखोंचे नुकसान
नाशिक शहरात अतिरिक्त कुमक दाखल
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी नाशिक पोलिसांच्या मदतीला इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाची (आयटीपीबीएफ) अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), सशस्त्र सुरक्षा दलच्या (एसएबी) तुकड्या नाशिकमध्ये दाखल आहेत. त्यामुळे यंत्रणा ‘अलर्ट’ असली, तरी पंतप्रधान मोदींची सभा निश्चित झाल्यास कुमक आणखीन मागविण्यात येईल. त्यासाठी ८ नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ नाशिकमध्ये दाखल होऊ शकेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा