Monday, May 26, 2025
Homeक्राईमNashik News : नशेचा बाजार खपवून घेणार नाही, साखळी उद्ध्वस्त करा; पोलीस...

Nashik News : नशेचा बाजार खपवून घेणार नाही, साखळी उद्ध्वस्त करा; पोलीस आयुक्तांचे एनडीपीएससह निरीक्षकांना आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी अंमली पदार्थविरोधी पथकाला (एनडीपीएस) संशयितांच्या वारंवार संपर्कात राहणाऱ्यांसह तस्करांची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक तपासाद्वारे संशयितांसोबत वारंवार बोलणारे, सोबत राहणारे, निकटवर्तींवर करडी नजर ठेवत त्यांचाही ‘ड्रग्ज’ तस्करीत सहभाग असल्यास कायदेशीर कारवाईची सूचना केली असून नशेतबाबत शहरात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एमडी, भांग, चरस, गांजा व अल्प्राझोलमवरील कारवाईत वाढ होणार आहे.

एनडीपीएस पथकाने (NDPS Squad) मागील अडीच वर्षांत सात टोळ्यांना गजाआड केले आहे. सर्व संशयित अमली पदार्थांच्या व्यवसायात गुन्हेगारी विश्वातून पुढे सरसावल्याचे उघड झाले आहे. संदीप कर्णिक यांनी आयुक्तपदाची सूत्रे नोव्हेंबर २०२३ मध्ये हाती घेतल्यापासून पथकाने कारवायांवर जोर दिला आहे. त्यानंतर पथकाने महिलांचा एमडी तस्कराकरीता समावेश असलेल्या चार ते पाच टोळ्या उघड केल्या. गंभीर बाब म्हणजे, एका पोलीस अंमलदाराचाही एमडी (Drugs) तस्करीत सहभाग असल्याने निष्पन्न झाल्यावर त्याला संबंधित गुन्ह्यात सहसंशयित करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्तांनी ही कठोर भूमिका घेतल्यानंतर आता ‘एनडीपीएस’च्या तपासाबाबतही लक्ष केंद्रीत केले आहे.

नियमित कारवाई करा

‘एनडीपीएस’ च्या गुन्ह्यातील संशयितांचे अनेकांशी लागेबांधे असतात. त्याच्या मूळाशी जात ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाईची सूचना केली आहे. अमली पदार्थांचा वापर, विक्री, साठा याबाबत कोणतीही गोष्ट शहरात खपवून घेतली जाणार नाही.

संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

पाठराखे अडकणार

एनडीपीएस पथकाला सर्व संशयितांच्या ‘सीडीआर’चे तांत्रिक विश्लेषण करुन तस्करांची साखळी उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत जुन्या-नव्या गुन्ह्यांत अनेक संशयितांसह ‘पाठराखण’ करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

शाबासकीची थाप

आयुक्त कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहय्यक आयुक्त संदीप मिटके हे सातत्याने एनडीपीएसला सूचना देत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वात पथकाने आतापर्यंत चार ते पाच मोठ्या टोळ्यांसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या शेकडो संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अविनाश फुलपगारे, अनिरुद्ध येवले, अर्चना भड, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, गणेश वडजे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे यांना आयुक्तांनी सन्मानित केले. तसेच वान पथकाचे अंमलदार विलास पवार, गणेश कोंडे व संतोष ससाणे यांचाही सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे

१) तेव्हाच्या कारवांचा तपास. सन २०२३ च्या सुरुवातीला शहरात एनडीपीएस पथक कार्यरत. २) ऑक्टोबर २०२३ मध्ये बहाळा गावात ‘छोटी भाभी’ च्या अड्‌ड्यांवर धाड. त्यापाठोपाठ ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलच्या सामनगाव येथील एमडी कारखाना, सनी पगारे व अर्जुन पिवाल यांचा सोलापुरातील कारखाना व गोदाम ‘एनडीपीएस’कडून उदध्वस्त

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वॉटर

समुद्रात वॉटर स्पोर्ट्स दरम्यान घडली मोठी दुर्घटना; सौरव गांगुलीचा भाऊ आणि...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगलीचा भाऊ स्नेहाशीष गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहे. रविवारी...