Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्हा बँकेला ओटीएस ठरणार संजीवनी; शासनाची मंजुरी

Nashik News : जिल्हा बँकेला ओटीएस ठरणार संजीवनी; शासनाची मंजुरी

थकबाकीदारांच्या प्रतिसादावर योजनेचे भवितव्य

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

जिल्हा बँकेने (District Bank) विशेष सर्वसाधारण सभेत नव्या सामोपचार योजनेला (Scheme) मंजुरी घेतल्यानंतर आता हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला (Approval) जाणार असून त्यानंतरच नव्या ओटीएस योजनेची अंमलबजावणी होणार आहे. साडेआठशे कोटींचा तोटा असलेल्या या बँकेचा एनपीए ८० टक्के झाला आहे. आता नाबार्डने बँक परवाना जप्त करू नये म्हणून हा ओटीएसचा प्रयत्न आहे. यापूर्वी चारवेळा अशी ओटीएस योजना राबवली. आताची योजना थकबाकीदारांच्या फायद्याची असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

बँकेने (Bank) एकरकमी परतफेड योजनेसाठी विविध व्याजदर आकारण्याचा ठराव मंजूर केल्याने यात यश आले तर बँकेचा परवाना वाचवणे शक्य होणार आहे. या योजनेला थकबाकीदार किती प्रतिसाद देतात यावरच या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या आठवड्यातील विशेष सभेत बँकेने तांत्रिकदृष्ट्या मंजुरी घेऊन स्वतःचा मार्ग मोकळा करुन घेतला. एक लाखापर्यंत २ टक्के, २ ते ५ लाखांपर्यंत ४ टक्के, पाच ते दहा लाखांपर्यंत ५ टक्के व दहा लाखांवर ६ टक्के व्याज अशी ही योजना आहे. याला ९०टक्के यश आले तरी १४२३ कोटी रुपये बँकेला मिळू शकतील व बँक परवाना वाचू शकेल.

YouTube video player

मात्र, दुसरीकडे शेतकरी आंदोलक शेतकरी (Farmer) समन्वय समिती मात्र मुद्दल वसुलीचे सात ते दहा हप्ते करुन द्यावे, संपूर्ण व्याज शासनाने भरावे यासाठी आंदोलन करत आहेत. तसेच जिल्हा बँक वाचवा सहकार वाचवा चळवळीचे निमंत्रक कॉ. राजू देसले (Raju Desale) यांनी जिल्हा बँक वाचवण्यासाठी ७५० कोटी रू. भागभांडवल राज्य सरकारने गुंतवणूक करावी, शेतकरी कर्ज समायोजन योजनेत व्याज राज्य सरकारने द्यावे, १२ लाख ठेवीदारांना न्याय द्यावा, वि.का. सोसायटी, पतसंस्था, शेतकरी वाचवा असे म्हटले आहे. आमच्याकडून पैसे मागण्यापेक्षा शासनाकडून निधी मिळवा, कर्जमाफी द्या, अशी मागणी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केली.

मंजुरीनंतर कार्यवाही

बँकेने सुधारीत ओटीएस योजनेला मंजुरी घेतली आहे. आता हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीला जाईल. ती मंजुरी मिळाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कर्ज वसुलीला दिलेल्या स्थगितीची मुदत ३० जूनला संपली आहे. मात्र ३० जूनपासून नोव्हेंबरपर्यंत नवे पीककर्ज वसूल करता येत नाही. मात्र जुने कर्ज वसूल करता येते. त्यादृष्टीने कार्यवाही होईल, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओटीएस योजना चांगली आहे. विद्याधर अनास्कर यांच्यासारखे दीर्घ अनुभवी लक्ष घालत आहेत. यातून बँकेला गतवैभव प्राप्त व्हावे अशी खूप इच्छा आहे. मात्र दिले गेलेले बोगस कर्ज कसे वसूल होणार? हा खरा प्रश्न आहे. तसेच कर्जावरील व्याजच एवढे वाढले आहे की, नेमके ते कशाप्रकारे वसूल होणार व त्याला शेतकरी कितपत प्रतिसाद देतात यावर याचे भवितव्य अवलंबून आहे.

विजय मोगल, नेते, बँक कर्मचारी

वाचवण्यासाठी ओटीएस योजना हा छोटासा प्रयत्न आहे. अनेक पर्यायांपैकी एक आहे. त्यातून बैंक लगेच पूर्वपदावर येईल असे वाटत नाही. त्यासाठी पूर्णवेळ प्रशासकीय मंडळ हवे. ओटीएसला जोडून इतर व्यवहार वाढवणारे उपक्रम हवे. एनपीए ८० टक्क्यांवर गेला आहे. याचा विचार करता बँक वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील.

ॲड. श्रीधर व्यवहारे, अध्यक्ष, बँक ठेवीदार

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...