Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम संकटात

Nashik News : ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम संकटात

पिकांवर रोगराईचे संकट; खोकला थंडी, तापाने नागरिक त्रस्त

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरासह ग्रामीण भागात थंडी (Cold) गायब होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अचानक वातावरणात (Environment) बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होऊन रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. पंधरा दिवसापूर्वी हिवाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) लावलेली जोरदार हजेरी त्यानंतर थंडीचा वाढलेला कहर आणि आता ढगाळ वातावरण असे एका पाठोपाठ एक संकट येत असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.दरम्यान, अचानक आणि वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खोकला, थंडी, ताप सारख्या आजारांनी तोंड वर काढले असून वयोवृद्ध आणि लहानमुले आजारी पडत असल्याने शासकीय रुग्णालयसह खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- Advertisement -

सध्या अनेक देशात युद्ध सुरु असून त्यात भरमसाठपणे वापरला जाणारा दारुगोळा, सतत केला जात असलेला बॉम्ब वर्षाव वेगवेगळ्या देशाकडून केली जात असलेली अणुबॉम्ब चाचणी, मोठ्या प्रमाणात केली जाणारी जंगल तोड यासह इतर कारणामुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वार्मिंगंचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे याचाच एक भाग म्हणून आता कधीही पाऊस पडतो कधी थंडी येते जाते तर तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अमेरिकेत ज्या काळात मोठ्या प्रमाणात बर्फीवृष्टी होत असते तेथे सध्या अग्नीतांडव सुरु आहे. दुष्काळ आणि वाळवंटासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियात इतका मुसळधार पाऊस (Rain) झाला की सर्वच नद्यांना महापूर आले.

मनमाडसह नाशिक जिल्हा (Nashik District) आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात पंधरा दिवसापूर्वी २८ डिसेंबर रोजी हिवाळ्यात चक्क पावसाळ्या पेक्षा जास्त अवकाळी पाऊस झाला आहे त्याचा फटका कांदे, गहू, हरभरा, मका या पिकांसह द्राक्षे आणि इतर फळबागांना मोठ्या प्रमाणात बसला त्यानंतर थंडीचा कहर सुरु झाला या नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी अद्यापही सावरलेला नसताना दोन दिवसापासून ढगाळ वातावरणाच्या रुपाने आलेल्या आणखी एका संकटाला तोंड देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

गेल्या दोन दिवसापासून थंडी गायब होऊन शहर परिसरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण तयार झाले असून अचानक वातावरणात बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होऊन रोगराई पसरत असल्याने रब्बीचा हंगाम धोक्यात आले आहे. एका पाठोपाठ एक संकट येत असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून तिकडे अचानक आणि वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसत असून खोकला, थंडी, ताप सारख्या आजारानी तोंड वर काढले आहे. सर्वात त्रास दमा असलेल्या रुग्णांना होत असून वयोवृद्ध आणि लहानमुले देखील आजारी पडत असल्याने शासकीय रुग्णालयसह खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...