Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik News : आयमाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी पानसरे तर कोषाध्यक्षपदी बोडके विजयी

Nashik News : आयमाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी पानसरे तर कोषाध्यक्षपदी बोडके विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष व कोषाध्यक्ष या दोन पदांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे तर कोषाध्यक्षपदी अविनाश बोडके यांनी विजय (Win) मिळविला. तर विद्यमान अध्यक्ष ललित बुब व हर्षद बेळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयमाच्या एकूण ३१ जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली होती. मात्र अध्यक्ष व कोषाध्यक्ष या दोनच पदांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली, उर्वरित सर्व जागा बिनविरोध झाल्या.

- Advertisement -

निवडणूक जाहीर होताच अध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे व कोषाध्यक्षपदासाठी अविनाश बोडके यांनी उमेदवारी जाहीर केली. मात्र,माजी अध्यक्ष मंडळांनी विद्यमान अध्यक्ष ललित बुब यांना पुन्हा संधी देण्याची भूमिका घेत त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत पानसरे व बोडके यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे ३१ जागांपैकी केवळ २ जागांवर निवडणूक घेण्यात आली.

YouTube video player

काल (शुक्रवारी) झालेल्या मतदान (Voting) प्रक्रियेत एकूण २३४५ मतदारांपैकी १४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्र पानसरे यांना ७८३ मते मिळाली. त्यांनी ललित बुब यांचा १२१ मतांनी पराभव केला. ललित बुब यांना ६६२ मते मिळाली असून ४९ मते बाद ठरली. कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अविनाश बोडके यांना ७५१ मते मिळाली. त्यांनी हर्षद बेळे यांचा ५८ मतांनी पराभव केला. हर्षद बेळे यांना ६९३ मते मिळाली असून या निवडणुकीतही ४९ मते बाद ठरली.

दरम्यान, या निवडणुकीत प्रथमच हायटेक प्रचाराचा प्रभाव दिसून आला. दोन्ही गटांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध व तांत्रिक प्रचार करण्यात आला. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पानसरे म्हणाले की, हा विजय माझा नसून आयमाच्या मतदारांचा (Voter) आहे. त्यांनी मला काम करण्याची संधी दिली असून, या विश्वासाचे सोनं करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...