नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवकाळीसह विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये (Natural Disaster) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) ई केवायसीसह इतर कागदपत्रांच्या पूर्तते अभावी मदतीपासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. ५ जून २०२३ पासून २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तींचा त्यात समावेश आहे.
अवकाळीसह (Unseasonal Rain) नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी त्यांना मदत जाहीर केली जाते. नाशिक जिल्ह्यात बहुतांश प्रमाणात कांदा, द्राक्षे आणि तांदुळाचे पीक घेतले जाते. त्यामुळे वातावरणाचा फटका बसल्याने या पिकांचे दरवर्षी नुकसान होत असते. त्यानंतर त्वरित त्याचे पंचनामे करण्यात येऊन शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो.
त्यात शेतकन्यांचा पंचनामा आणि शेतकऱ्यांची ओळख हा महत्त्वाचा पुरावा असल्याने त्याची कमतरता भासल्याने हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.ई-केवायसी (E-KYC) न केल्यामुळे दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ६८३ शेतकऱ्यापैकी ७१३६ शेतकऱ्यांवर मदतीपासून वंचित असल्याचे समोर येत आहे या लाभाव्यौसाठी प्राप्त ५ कोटी २३ लाख ९२ हजार ३७२ रुपयांची नुकसान भरपाई शासकीय तिजोरीत पडून आहे.
आवरणाला अल्प प्रतिसाद
शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ई- केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्याने मिळण्यास अडचण होते. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने सातत्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी यादृष्टीने आवाहन केले. त्यास पूर्णतः प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बहुतांश लाभार्थी याच कारणांमुळे या लाभापासून वंचित राहत असल्याचे बोलले जाते आहे.
ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा
ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतक-यांनी तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी अभावी लाभापासून कोणताही शेतकरी बंचित राहू नये. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा यंत्रणेने केले.