नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide Death) केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभम बाळासाहेब व्यापारी (२१,रा. लक्ष्मीनगर,महाले फार्म,नवीन नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी हे फळ व्यवसायिक होते.त्यांचा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सिन्नरच्या घाटात अपघाती मृत्यू झाला होता. वडिलांच्या (Father) निधनानंतर दहावा व तेरावा असे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर शुभम घरातून निघून गेला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे देखील वाचा : Nashik Politics : खासदार संजय राऊतांनी मंत्री महाजन अन् आमदार ढिकले यांच्यातील संभाषणाचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर; नेमकं काय म्हटलंय?
दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी संपूर्ण नाशिक शहरात (Nashik City) त्याचा शोध घेतला. मित्र, नातेवाईक, संभाव्य ठिकाणे तपासली मात्र चार दिवस उलटूनही शुभमचा काहीही थांगपत्ता लागला नाही.अखेर (दि.१९) सकाळच्या सुमारास खांडे मळा परिसरातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना परिसरातील नागरिकांना दिसला. नागरिकांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्याला माहिती दिली.
तसेच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.सदर मृतदेह शुभम व्यापारी याचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, वडिलांच्या अचानक निधनामुळे तो मानसिक तणावात होता का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई,लहान भाऊ, आजोबा, आजी असा परिवार आहे.




