Tuesday, April 8, 2025
HomeनाशिकNashik News : डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik News : डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ओझे | विलास ढाकणे | Oze

मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narahari Zirwal) हे सातत्याने रुग्णसेवेसाठी तत्पर असून त्यांनी नाशिक-मुंबईमध्ये (Nashik-Mumbai) स्वतंत्र रुग्णसेवकांची नियुक्ती करून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे शिबिराचे आयोजन करत रुग्णांपर्यंत सेवा पोहचवत असून गरजू रुग्णांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख यांनी केले.

- Advertisement -

जागतिक आरोग्य दिनाचे (Health Day) औचित्य साधत युवानेते गोकुळ झिरवाळ यांचे संकल्पनेतून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात मा.ना.नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू व इतर शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी देशमुख बोलत होते. या शिबिरास रुग्णांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत ७७५ रुग्णांनी या लाभ घेतला. सकाळी रुग्णांच्या (Patients) हस्ते फीत कापून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कादवा चे संचालक बाळासाहेब जाधव, जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख, प्रकाश शिंदे भाजप नेते चंद्रकांत राजे, माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ,शिवाजी बाबा पिंगळ,उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, गोकुळ झिरवाळ, प्रीतम देशमुख, कैलास देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद उफाडे, हेमंत पगारे,उपनगराध्यक्ष माधुरी साळुंखे, शैला उफाडे ,सुजित मुरकुटे, दीपक जाधव,नितीन गांगुर्डे,कृष्णा मातेरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिबिरात एकूण ७७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४६१ रुग्णांना उपचार सुचविण्यात आले. त्यात ३१८ मोतीबिंदू, ४ तिरळेपणा २ आर्टिफिशियल डोळ्यांचा तर १३७ रुग्णांना चष्मा सुचविण्यात आला. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रुग्णांचे ऑपरेशन व चष्मे वाटप करण्यात येणार आहे, तसेच यापुढेही विविध आजारांचे तपासणी उपचार शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ शशिकांत आवारी, डॉ. सृष्टी घुगे, डॉ. हेमंत घांगले, डॉ. समीर काळे, डॉ. ओम् कदम, डॉ पुणवत्कर, डॉ. प्रमोद गजबे आदी वैद्यकीय पथकाने तपासणी केली पथकाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्कार करत आभार मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : अवकाळी-गारपिटीने आंबामोहरची पडझड; रोगराई वाढल्याने उत्पादनात मोठी घट

0
मनमाड | बब्बू शेख | Manmad मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा (Temperature) पारा वाढण्यास प्रारंभ झाला असतांना काही दिवसापूर्वी अकस्मात निर्माण झालेले ढगाळ वातावरण व त्यापाठोपाठ...