डुबेरे | वार्ताहर | Dubere
येथून जवळच असणाऱ्या साबरवाडी (Sabarwadi) येथील विवाहितेने (Married Woman) चिमुरडीसह आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज (दि.२७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,”पल्लवी संदिप बिन्नर (२१) व मुलगी ज्ञानेश्वरी (६ महिने) असे मृत माय-लेकीचे नाव आहे. पल्लवी ही शुक्रवारी दुपारी १२ वाजता घरात कुणाला काही न सांगता मुलीला घेऊन घराबाहेर निघून गेली होती. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही न सापडल्याने नातेवाईकांनी (Relatives) हरवल्याची तक्रार सिन्नर पोलिसांत शनिवारी (दि.२५) रोजी दाखल केली होती. यानंतर आज सकाळी ९ वाजता वस्तीजवळीलच सुकदेव रामभाऊ सदगीर यांच्या विहिरीवर मुली धूणे धुण्यासाठी गेल्या असता त्यांना पल्लवीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले.
त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ विहिरीकडे (Well) धाव घेतली. यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली. यावेळी पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी पल्लवीचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढला. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्याही मृतदेहाचा शोध घेऊन बाहेर काढत सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे वस्तीवरील वातावरण तणावग्रस्त बनले होते.