Saturday, May 31, 2025
Homeमुख्य बातम्याNashik News : भाजप शहराध्यक्षपदी सुनील केदार यांची वर्णी

Nashik News : भाजप शहराध्यक्षपदी सुनील केदार यांची वर्णी

नाशिक दक्षिणचे सुनील बच्छाव तर उत्तरचे यतीन कदम जिल्हाध्यक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी (Nashik BJP City President) रस्सीखेच सुरु असल्याने जिल्हाध्यक्षांचा तिढा कायम हेाता . मात्र आज शहराध्यक्षपदी सुनील केदार (Sunil Kedar) यांचा नियुक्ती झाल्याने जिल्हाध्यक्षपदाचाही तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक ५८ शहर व जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली होती. मात्र, त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

आगोदरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नव्हता. त्यात जिल्हाध्यक्षपदाचीही (District President) भर पडली होती. यापूर्वी मंत्रीपदासाठी भाजपा आमदारानी (BJP MLA) कंबर कसली होती. मात्र त्यातही फारसे यश आले नाही. उलट मित्र पक्षांनीच बाजी मारली. त्यामुळे पालकमंत्रीपद तरी आपल्या पक्षाकडे असावे म्हणून गेले चार महीने झाले तरी निर्णय झालेला नाही. यामध्ये शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदाची देखील भर पडली होती. अखेर हा तिढा आज सुटला आहे. नाशिक शहराध्यक्षपदी सुनील केदार तर नाशिक दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव आणि उत्तरच्या यतीन कदम (Yatin Kadam)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२०२३ मध्ये माजी नगरसेवक प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांची शहराध्यक्षपदी तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव (Sunil Bachhav) व शंकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी नाशिकमध्ये (Nashik) येऊन पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर जाधव, बच्छाव आणि वाघ यांची निवड झाली होती. महापालिका आणि जिल्हा परिषद ,लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी  संघटनात्मकदृष्ट्या मोठे काम केल्यामुळे लोकसभा निवडणुक वगळता गत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दैदीप्यमान यश त्यांच्या कारकीर्दीत मिळाले होते.

आता चार महिन्यांनी महापालिका व जिल्हा परीषदेच्या निवडणुका असल्याने पुन्हा एकदा आपलीची शहराध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठा प्रशांत जाधव प्रयत्नशील होते. तर दुसरीकडे अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ पदाधीकारी उत्तमराव उगले, सुनील केदार, नाना शिलेदार, पवन भुगरकर, अनिल भालेराव यांनीही शहराध्यपदासाठी मोर्चे बांधणी केल होती. जाधव यांना विरोध नाही मात्र नव्या चेहर्‍याला संधी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. सर्वच एकनिष्ठ व सक्षम असल्याने शहराध्यपद कोणाला द्यावे हा प्रश्न होता. त्यामुळे जिल्हााध्यक्षपदाचीही नावे जाहीर करणे वरीष्ठांना अशक्य झाले होते. यामुळे त्यानी वेट अ‍ॅण्ड वॉचची पक्षाने भूमिका घेतली हाती.

दरम्यान, आगामी निवडणुका लक्षात घेता नव्या अध्यक्षांच्या निवडीला विशेष महत्त्व आले होते. अखेर केदारांच्या गळ्यात ही माळ पडली आहे. प्रशांत जाधव यांच्या अगोदर भाजपच्या (BJP) शहराध्यक्षपदी गिरीश पालवे होते. २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारली होती. तसेच त्यांचे शहराध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले होते. त्यावेळी गिरीश पालवे यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर पालवेंना दोन वेळेस मुदतवाढ मिळाली होती. तशीच मुदतवाढ यंदाही मिळावी असा जाधवांचा प्रयत्न होता. मात्र प्रतिस्पर्धी मान्य करत नव्हते.

सुनील केदार यांचा परिचय

नाव – सुनील रघुनाथ केदार
शिक्षण – बी कॉम
जन्मतारीख – १४/१२/१९६४
वय – ६०
वर्ग – हिंदु वंजारी
१) १९९० ते १९९९ सक्रिय कार्यकर्ता
२) १९९९ ते २००९ नाशिक भाजप व भाजयुमो प्रसिद्धी प्रमुख
३) २००९ ते २०१३ भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष
४) २०१३ ते २०१६ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस
५) २०१७ ते २०१९ भाजप नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष
६) २०१९ ते २०२५ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस.
७) चेअरमन – जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.
८) संचालक – कादवा सहकारी साखर कारखाना नाशिक,दिंडोरी
९) संचालक – नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन.
१०) संचालक – ऊमराळे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्था.
११) सलग ५ विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात प्रवासी कार्यकर्ता प्रचारक.
१२) १ वेळ राजस्थान कोटा येथे विधानसभा निवडणुकीत प्रवासी कार्यकर्ता प्रचारक.
१३) प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग.
१४) संस्थापक – पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था, पंचवटी, नाशिक.

यतीन कदम यांचा परिचय

भाजपचे नवनियुक्त नाशिक उत्तरचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम (Yatin Kadam) हे निफाडचे माजी आमदार रावसाहेब कदम आणि मंदाकिनी कदम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी सुरुवातीला मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळेस देखील त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांची पक्षाने नाशिक उत्तरचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. ते निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या