Monday, January 26, 2026
HomeनाशिकNashik News : बडगुजर विरुद्ध आमदार हिरे वाद मिटवण्यासाठी कड अंबडला?

Nashik News : बडगुजर विरुद्ध आमदार हिरे वाद मिटवण्यासाठी कड अंबडला?

नवीन नाशिक | निशिकांत पाटील | New Nashik

भाजपमध्ये (BJP) नुकतेच प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि त्यांच्या प्रवेशाकरिता विरोध करणाऱ्या आ. सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांच्यातील वादामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) नियुक्ती केल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) शिवसेना उबाठा पक्षाचे सुधाकर बडगुजर व भाजपच्या आ. सीमा हिरे यांच्या कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाली होती. तेंव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या निवडणुकीत आ. सीमा हिरे यांनी बाजी मारली होती, बडगुजर व त्यांच्या मुलावर त्याकाळात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

YouTube video player

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बडगुजर यांचा भाजप प्रवेश व त्यास आ. हिरे यांनी केलेला प्रखर विरोध बघता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात होणारे वाद टाळण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचा पूर्वानुभव असलेले मधुकर कड (Madhukar Kad) यांची नियुक्ती करण्यात आली, अशी चर्चा आहे.

मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर बदली

बडगुजर, आ. हिरे वाद जरी बाहेरून शांत झाला असला तरी आगामी महापालिका निवडणुकीत (NMC Election) तो उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचा पूर्वीचा अंबडचा अनुभव लक्षात घेत निवडणूक काळात वादंग निर्माण होऊ नये, याकरिता त्यांची पुन्हा अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली. यापूर्वी नवीन नाशकात उच्छाद घालणारी टिप्पर गँगचा नायनाट केला होता. बङ्गुजर व आ. हिरे समर्थकांसोबत कह यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग अंबडच्या हद्दीत आहे. यासोबतच सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणारी गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अनुभव कामात येईल, अशी चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस निरीक्षक शिळीमकर व उपायुक्त कराड यांना ‘राष्ट्रपती पदक’

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या...