नाशिक | प्रतिनिधी Nashik
शाळांना ( Schools ) मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे (As a grant ) नियमित वेतन सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर ( Zilla Parishad Secondary Education Officer Dr. Vaishali Jhankar-Veer )यांना लाचप्रकरणात चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी होत्या. कर्मचाऱ्यांमध्येही त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खातेप्रमुख लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत कार्यदेश काढण्यासाठी नऊ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना शिक्षणाधिकारी यांचे वाहनचालक ज्ञानेश्वर येवले याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याला लाचेसंदर्भात विचारणा केली असता त्याने डॉ. झनकर-वीर यांचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन पथक थेट डॉ.झनकर-वीर यांच्या कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाचे दार बंद करून घेण्यात आले होते.
जिल्हा परिषद भाजप गटनेते डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधींनाही न जुमानता कामे करण्याची शैली असल्याने वेळोवेळी त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
दरम्यान, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणतीही माहिती न देता ठाणे जिल्ह्यातील पथकाने ही कारवाई केल्याने झनकर यांच्या कारभार समोर आला आहे. पथकाने संपूर्ण कारभाराचीच सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण संस्था चालकांकडून होत आहे.
प्रथमच एक खातेप्रमुख लाच घेताना पडकला गेल्याने जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.