Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पुरोहित संघाच्या दोन गटांतील वाद चिघळला; नेमकं कारण काय?...

Nashik News : पुरोहित संघाच्या दोन गटांतील वाद चिघळला; नेमकं कारण काय? Video आला समोर

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून आजी-माजी अध्यक्षाचे दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे रामकुंडावर (Ramkund) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. आजी माजी अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीस सोमवार (दि.२८) रोजी उपस्थित राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.

- Advertisement -

नाशिक शहराला गेल्या महिनाभरापासून सिंहस्थ पार्श्वभूमीवर असलेला पुरोहित संघाचा वाद सर्वश्रुत आहे. रविवारी (दि.२७) माजी अध्यक्ष सतीश शुक्ल (Satish Shukla) यांनी श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ यांची बैठक घेतली. यात त्यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. रात्री सुमारे सव्वाआठ वाजेच्या सुमारास श्री गंगा गोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी (Chandrasekhar Panchakshari) हे त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या पुरोहित संघाचा फलक लावण्यासाठी आले होते. त्यावेळी प्रतीक शुक्ल कार्यालयात असताना अचानक पंचाक्षरी याच्यासह पदाधिकारी घुसले असताना त्यांची बाचाबाची सुरू होती. त्याच दरम्यान सतीश शुक्ल त्याठिकाणी आले.

त्यानंतर पंचाक्षरी व पदाधिकारी व शुक्ल यांच्यात शाब्दिक चकमक अधिक वाढली. या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळताच घटनास्थळी तत्काळ पोहचले आणि पंचाक्षरी व शुक्ल यांच्यात असलेला वाद मिटावा म्हणून प्रयत्न केले. या संपूर्ण प्रकारामुळे रामकुंड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुरोहित संघातील वाद अधिक चिघळण्याची चिन्हे बघता पोलिसांकडून दोन्ही गटातील अध्यक्ष व पदाधिकारी यांना सोमवारी (दि. २८) पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...