Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद

Nashik News : लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद

मनमाड-येवला मार्गावर रास्तारोको

नाशिक | Nashik

केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावरील (Onion) लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे, शेतकऱ्यांना २५ रुपये किलो अनुदान मिळावे, नाफेड आणि एनएफसीसीने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्ट्राचार झाल्याने त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मनमाड-येवला मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच येवला-लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव देखील बंद पाडले.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. मागील १० दिवसांत क्विंटल मागे जवळपास २ हजार रुपयांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला क्विंटलमागे सरासरी १८०० ते २००० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याचे भाव गडगडल्याने, आहे त्या भावात उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर आज सुद्धा येवला-लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Yeola-Lasalgaon) कांद्याचे लिलाव बंद पाडले. दररोज होणाऱ्या कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...