ओझे | विलास ढाकणे | Oze
कादवा सहकारी साखर कारखान्याने (Kadwa Sugar Factory) चालू गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाच्या बिलापोटी एफआरपीचा पहिला हप्ता प्रति मे.टन रु.2800 प्रमाणे निर्णय घेणेत आलेला असल्याची माहिती कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. यापुर्वी सुरुवातीला प्रति मे.टन रु.2500 प्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली आहे. फरकाची रक्कम कारखान्याने उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेली आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून आजअखेर 1,18,353 मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.63 टक्के आहे. 1,25,750 क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तसेच कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्पही सुरू असून आतापर्यंत इथेनॉल 8,37,844, आर.एस 13,75,627 लिटर निर्मिती करण्यात आली आहे.
सध्या साखर उद्योग अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना देखील कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी अदा करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कादवाने कायम राखली असून पुढेही जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले.
हंगाम संपल्यानंतर शासन नियमांनुसार अंतिम एफआरपी दर ठरणार असून, वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक ऊस भाव देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखाना कायम ठेवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ठरलेल्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोड करून कारखान्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कादवालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.




