नाशिक | Nashik
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रसंत भिमा भोई (Sant Bhima Bhoi) यांच्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा पावसाच्या सरीत दिमाखात पार पडला. यावेळी विशेष आकर्षण असलेल्या भोईसमाजाचा प्रसिद्ध नटराज बँड व भोईराज मित्र मंडळ नाशिकचे (Nashik) मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पावसाच्या (Rain) सरी चालू असतांना सुद्धा उपस्थित समाजबांधवांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला व कार्यक्रम संपेपर्यंत आपली उपस्थिती कायम ठेवली. यावेळी राष्ट्र संत भिमा भोई मंदिरावर महाआरती करून कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पुढच्या वर्षी पर्यंत मंदिर परिसराचे (Mandir Area) कंपाउंड वॉलचे काम तसेच सभामंडपाचे काम पूर्ण करण्याचे आश्वसित केले.
दरम्यान, यावेळी युवा नेतृत्व अमोल दिनकर पाटील यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर भोईसमाजाच्या वतीने ज्येष्ठ समाजबांधवांना सोबत घेऊन सभामंडपाचे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी शामराव धनराळे, अनिल निंबा मोरे, सोमनाथ धोंडीराम साटोटे, बापू जगन्नाथ श्रीनाथ, ईश्वर त्र्यंबक खेडकर, विक्रम धाकु मोरे, वामन तमखाने,संजयजी लाडे (पनवेल) भरजी ढोले,आण्णासाहेब मोरे, सुरेश मोरे, निलेश वाडीले, गोकुळ शिवदे, नामदेव मोरे,राजेश मोरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.