Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : सावळघाटात कठड्याला धडक देऊन ट्रक आगीत भस्मसात

Nashik News : सावळघाटात कठड्याला धडक देऊन ट्रक आगीत भस्मसात

पेठ | वार्ताहर | Peth

नाशिक-पेठ मार्गावरील ( Nashik-Peth Highway) सावळघाटात रविवार (दि २९) रोजी नाशिकहून पेठकडे येणारा मालवाहू ट्रक क्रमांक (एमएच १७ बी वाय ८५६३) वेगाने येत असताना ट्रक चालकाचे (Truck drive) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण (Vehicle control) सुटल्यामुळे ट्रकने घाटाच्या संरक्षक भिंतीस धडकून पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी ट्रक पेटल्यामुळे काही तास घाट वाहतुक बंद पडल्याने दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती .

तसेच या घटनेबाबत अद्यापही पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार प्राप्त झालेली नसल्याने अपघात नेमका कुठल्या कारणामुळे घडला. ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडण्याचे कारण अनभिन्न असल्याने कुठल्या ज्वालाग्राही पदार्थाची वाहतुक करत होता याचा तपास होणे गरजेचे असल्याची भावना वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...