Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : इतिहासात नोंद होईल असा भाजप महायुतीचा विजय - भाजप...

Nashik News : इतिहासात नोंद होईल असा भाजप महायुतीचा विजय – भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारतीय जनता पक्षाने “महाविजय २०२४ संकल्प” असा दिलेला नारा कार्यकर्त्यांच्या बळावर सार्थ ठरवला व न भूतो न भविष्यति असा विजय मिळवून देत विधानसभेवर एकहाती सत्ता मिळवून दिली.हा विजय अहोरात्र झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. घरगुती कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजप कार्यालयात संवाद साधला.

- Advertisement -

हे देखील वाचाNashik Crime News : गर्दीचा फायदा घेत चोरट्याने केले दागिने लंपास

लोकसभेत विरोधकांनी कांदा प्रश्न,संविधानाबाबत खोटी विधाने, आदिवासी व दलित बांधवासह सर्व मागासवर्गीयांची दिशाभूल असे खोटे आश्वासन अशा प्रकारे खोट्या अफवा पसरवुन विजय मिळवला.तथापि एका बुथवर त्यावेळी किमान २० मते वाढवली असती तरी सुध्दा भाजप महायुतीचे ४२ खासदार निवडून आले असते. तो धडा घेऊन आपण सर्वजण विधानसभेत ताकदीने लढलो व ऐतिहासिक विजय मिळविला असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करून मतदानात वाढ केली व म्हणुनच राज्यात भाजप महायुतीचा विजय सुकर झाला असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचाNashikroad : रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी

दिनांक ५ डिसेंबरला ५ वाजता मुंबईत आझाद मैदानावर जल्लोषात भाजप महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्याकरिता राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधिंना आमंत्रित केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.लाडक्या बहिणीं,शेतकरी,युवा वर्ग, व्यापारी, उद्योजक सर्वांनीच महायुतीला भरभरून मते दिल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.

हे देखील वाचा Niphad : निफाड पूर्व भागात बिबट्याची दहशत

आगामी म न पा, जिल्हा परिषद, पंचायत समिती इ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी मंडल स्थर ते केंद्र अशा पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार असुन प्रत्येक विधानसभेत किमान ५० हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्यात बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला घवघवीत यश मिळाले त्याबद्दल भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आ.अँड.राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्या विजयाबद्दल त्यांचा सत्कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील वाचाNashik Crime News : चोरट्यांनी फोडली दानपेटी

नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ जागा महायुतीने जिंकल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पहाणारे सर्वच्या सर्व रथी महारथी पराभुत झाल्याचे त्यांनी म्हटले. याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, अ‍ॅड.राहुल ढिकले, आ.सीमा हिरे,ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, सरचिटणीस सुनील केदार, काशिनाथ शिलेदार,शाम बडोदे, महेश हिरे आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...