शिरवाडे वाकद। वार्ताहर Shirvade Vakad
निफाड पूर्व भागात बिबट्याने उच्छाद मांडला असून गोपालनासाठी आलेल्या राज्यस्थानी गोरक्षकावर हल्ला केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. निफाड पूर्व भागात वाकद, देवगाव फाटा परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून मागील सप्ताहापासून तीन-चार दुचाकी चालकांवर आणि शेतकर्यांवर प्राण घातक हल्ले बिबट्याने केले आहे.
हे देखील वाचा – Political News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार
वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरातील देवगाव फाटा, मानकर वस्ती, ओतुरकर वस्ती, फिरस्ती माता परिसर, निकम वस्ती, शिंदे वस्ती आदी ठिकाणी बिबट्याचे संध्याकाळ पासूनच दर्शन होते. या परिसरात दोन-तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाकद शिवारात शिंदे वस्तीवरील नाल्याजवळ रात्रीचे वेळी घरी जात असताना वाल्मीक गवळी या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.
हे देखील वाचा Crime : चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली
परिसरामध्ये बिबट्याची चांगली दहशत झाली असून वस्त्यांवरील शेतकर्यांना आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी सोबत जावे लागत आहे. शेतामध्ये पाणी भरण्यासाठी व शेतामधील काम करण्यासाठी मजूर मिळत नाही, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बिबट्याने वासरांवर हल्ले केले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या गुरे वासरांच्या संरक्षणासाठी जाळी बांधलेली असूनही वासरांच्या संरक्षणासाठी रात्री दोन-तीन वेळेस फटाक्याचा आवाज करावा लागत आहे. बिबट्याने वस्त्यांवरचे कुत्रे फस्त करून आपला मोर्चा नागरिकांकडे वळविल्याने परिसरात बिबट्याची चांगली दहशत निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती?
देवगाव, वाकद परिसरातील शेतकरी व कामगार यांच्या मनावर बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग अधिकार्याने एका ठिकाणी पिंजरा लावलेला असून पिंजर्याच्या संख्येत वाढ करून बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा व पुढील अनर्थ टाळावा.
रामचंद्र शिंदे, वाकद
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा