Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : तिवंधा चौक परिसरातील परदेशी वाड्याची भिंत कोसळली

Nashik News : तिवंधा चौक परिसरातील परदेशी वाड्याची भिंत कोसळली

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) येथील तीवंधा चौक परिसरातील परदेशी वाड्याची भिंत कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठा अपघात (Accident) टळला असला तरी वाड्याजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. जुना वाडा धोकादायक स्थितीत असल्याने परिसरातील नागरिकांना तिथून तात्पुरती स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून (NMC) आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

YouTube video player

दरम्यान, पावसामुळे आणि वाड्याच्या जिर्णावस्थेमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेने परिसर सील करून तातडीने दुरुस्ती व पाडकामाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ताज्या बातम्या