Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी 'ही' नावे चर्चेत; भाजपकडून...

Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?

नाशिक | Nashik

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) राज्यातील २९ महापालिकांसाठी मंत्रालयात महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला महापौर असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळाली आहे. या आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

YouTube video player

नाशिक महापालिका निवडणुकीत १२२ पैकी भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, महापौरपदाचे आरक्षण सुटले नसल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. यानंतर आज (गुरुवारी) आरक्षण सोडत झाली असता नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे भाजपमधील महापौरपदाच्या शर्यतीत असलेली नावे समोर आली आहेत.

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

त्यानुसार महापालिकेत प्रभाग क्रमांक सात मधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे राजकीय वारसा, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकद असल्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव पहिल्या नंबरवर आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक सात मधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या स्वाती भामरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या कन्या संध्या कुलकर्णी, मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांची पत्नी दिपाली गीते यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

तसेच माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी डॉ. योगिता हिरे, पहिल्यांदाच निवडून आलेल्या माजी महापौर विनायक पांडे यांची सून आदिती पांडे, श्वेता भंडारी, चंद्रकला धुमाळ, रोहिणी पिंगळे, जयश्री गायकवाड यांच्यासह सुप्रिया खोडे, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार यांचेही नावे महापौर पदासाठी रेसमध्ये आहेत. त्यामुळे आता महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

पक्षांतर्गत हालचालींना वेग

आरक्षण जाहीर होण्याआधीच भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी हालचाली वाढवल्या होत्या. विविध पातळ्यांवरून पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते आणि संघटनात्मक नेतृत्वाकडे मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यामुळे आता महापौरपदासाठी उमेदवार ठरवताना पक्षातील ज्येष्ठता, महापालिकेतील अनुभव, पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामगिरी, वरिष्ठांशी असलेली जवळीक आणि शिफारसी या सर्व बाबींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....