Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : शहरात तिघांची आत्महत्या; कारणे अस्पष्ट

Nashik Suicide News : शहरात तिघांची आत्महत्या; कारणे अस्पष्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात आत्महत्यांच्या (Suicide) घटना रोखण्यात कुटुंबांसह सर्वच यंत्रणांना अपयश आले आहे. दररोज दोन ते तीन जण आत्महत्या करत असून शुक्रवारी (दि.१८) तिघांनी गळफास घेऊन जीवन संपविले. त्यात एका २० वर्षीय तरुणीचाही (Girl) समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नसून अंबड, म्हसरुळ व आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कामटवाडा (Kamtwada) भागात राहणाऱ्या सुनील तुळशीराम रिपोर्ट (५८ रा., विठ्ठल नगर, वावरेनगर) यांनी शुक्रवारी घरात गळफास घेतला. मुलगा अजिंक्य याने जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.

YouTube video player

दुसरी घटना म्हसरुळ हद्दीतील बोरगड भागात घडली. कैलास तुकाराम चौधरी (वय ४७, रा., प्रगतीनगर, बोरगड) यांनी शुक्रवारी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच मुलगा विनीत याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे तपासून मृत घोषित करण्यात आले. म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.

तिसरी घटना आडगाव हद्दीतील अमृतधाम भागात घडली. पूजा दीपक डांबरे (२० रा. विहंग, वी. डी. कामगारनगर) हिने शुक्रवारी रात्री घरातील हॉलमध्ये गळफास घेतला. त्यात तिचा मृत्यू झाला. पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी प्रकाश अहिरे यांनी दिलेल्या माहितीन्वये आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgon Police Station) नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...