Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik News: त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाची हजेरी; कुशावर्त, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी

Nashik News: त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाची हजेरी; कुशावर्त, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर
नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गावातील सखल भागात पावसाचे पाणी साचले. तासाभराच्या पावसामुळे रस्त्यांना अक्षरक्षः नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे अतोनात हाल झाल्यामुळे स्थानिक नागरिकांची आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या गावामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहे. काही भागांत तर शेतजमिनीची मातीही पाण्यासोबत वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाचे पाणी शेतात आणि रस्त्यांवर साचल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाची हजेरी; कुशावर्त, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी

YouTube video player

त्र्यंबकेश्वरमध्ये बुधवारी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने रस्त्यांना ओढा नाल्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पहायला मिळाले. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाल्याचे पहायला मिळत आहे. सलग तीन दिवसांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस सुरु आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : भरदिवसा घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील केडगाव भागात एका विवाहितेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घर उघडे असल्याचा फायदा घेऊन एका व्यक्तीने घरात प्रवेश केला...