Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedNashik News : खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

Nashik News : खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर (Satpur) येथील शिवाजीनगरमधील (Shivaji Nagar) बांधकाम साईटच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश किरण गाडे (वय १५) रा. शिवाजीनगर जलकूभं आणि प्रणव विनोद सोनटके (वय १५) रा. अथर्व सुमर मार्केटकडे, पठार चौक, अशी पाण्यात बुडून मृत्यू (Death) झालेल्या मुलांची (Children) नावे आहेत. कार्बननाका जवळील मनपा विद्यालयाजवळीस गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यात मुसळधार पावसाने पाणी साचले होते.

हे देखील वाचा : गुरुंना निवृत्त होता येणार नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

यामध्ये (दि.५) रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वयाेगटातील ४ ते ५ मुले पोहण्यासाठी गेली. तेव्हा ते दोघे पाण्यात उतरल्यानंतर दोघांचे पाय चिखलात रुतल्याने ते गटांगळ्या खात पाण्यात बुडाले. यावेळी इतर मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी (Citizen) घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील वाचा : Nashik News : गॅरेज मालकाचा प्रामाणिकपणा; ११ लाखांचा मुद्देमाल असलेला डबा केला परत

मात्र, दोघांना वाचविण्यात अपयश आले. त्यानंतर सायंकाळी अग्निशमन दलास (Firefighters) कळविण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृत हे दोघेही जनता विद्यालयाच्या बालशिक्षण मंदिरात इयत्ता नववीमध्ये एकाच वर्गात शिकत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...