नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारकडे (Bihar) निघाल्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या (Nashik Road Railway Station) काही अंतरावर तीन प्रवासी खाली पडले. यात दोन जणांचा मृत्यू (Death) झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशापैकी (Passengers) जे दोन मृत्युमुखी पडले त्यांची नावे अद्याप समजलेली नाही. तर एक जण गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्मभूमी एक्सप्रेसने नाशिकरोड रेल्वेस्थानक सोडल्यानंतर रेल्वेलाईनवर असलेल्या ढिकले नगर येथील हनुमान मंदिर जवळ हे प्रवासी प्रचंड गर्दीमुळे खाली पडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सदरची घटना ओढा रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आकाश यांना समजताच त्यांनी पोलिसांशी (Police) संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक माळी, हवालदार भोळे हे पोहोचले. यानंतर त्यांच्याकडून पंचनामा करून मृत्यू झालेले प्रवासी कुठले आहेत याबाबत माहिती घेतली जात आहे.




