Monday, March 31, 2025
HomeनाशिकNashik News : दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Nashik News : दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील सावखेडा (Sawkheda) येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून (Drowning) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी, (दि. ३१) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सावखेडे (ता. येवला) येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात (Farm) शुभम शांताराम गोरे, साई संदीप कुमावत (वय १२) ही दोन शाळकरी मुले अंघोळीसाठी गेली होती.

दरम्यान, यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शेततळ्यातील पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीसात (Taluka Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुजबळांनी घेतली मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट

येवला दौऱ्यावर असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. तसेच मतदारसंघातील शेततळ्यांमध्ये पुन्हा असे अपघात होऊ नये यासाठी शेततळ्यांना संरक्षक जाळी बसविण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, वसंत पवार, दीपक लोणारी, दत्ता निकम, मकरंद सोनवणे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या