नाशिक | Nashik
राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस दमदार हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतांना पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून २५ मे पर्यंत अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिक छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडताना दिसत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव,धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरच्या विविध तालुक्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे. अशातच आज नाशिक शहरामध्ये (Nashik City) देखील सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, शालीमार, मेनरोड, पंचवटी यासह आदी भागांत पावसाने (Rain) हजेरी लावल्याचे दिसून आले. तर रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.
वाऱ्यामुळे रस्त्यावर फांद्या कोसळल्या
पंचवटीमधील लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्या आहेत. तसेच पंचवटी विभागीय कार्यालयाच्या उतारावरील बच्छाव हॉस्पिटलसमोर वॉटर लॉगिंग झाले आहे.