Wednesday, January 28, 2026
HomeनाशिकMadhavi Jadhav : मातीचे काम दिले तरी करेन, पण बाबासाहेबांची…; मंत्री गिरीश...

Madhavi Jadhav : मातीचे काम दिले तरी करेन, पण बाबासाहेबांची…; मंत्री गिरीश महाजनांना भिडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?

नाशिक | Nashik

काल (सोमवारी) प्रजासत्ताक दिनानिमित मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ध्वजारोहण केले. यावेळी महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी थेट जाब विचारला. त्यामुळे यावरून विरोधकांनी मंत्री महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत महाजन यांनी अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे राहून गेल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. यानंतर आता महाजनांना भिडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, माधवी जाधव (Madhavi Jadhav) या सध्या वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. २०११ साली त्या वनविभागात भरती झाल्या होत्या. सध्या सिन्नर (Sinnar) येथे माधवी जाधव कार्यरत आहेत. काल (सोमवारी) माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे देखील उपस्थित होत्या. त्यांनी काल (सोमवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr.Babasaheb Ambedkar) नावाने घोषणा दिल्या होत्या.

YouTube video player

माधवी जाधव यांनी नेमक्या काय घोषणा दिल्या होत्या?

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव भाषणात आले नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नाव वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्यांचे नाव भाषणात का नाही? अशी विचारणा माधवी जाधव यांनी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले होते?

प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या प्रकरणानंतर मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलतांना म्हणाले होते की, मला आज खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो, नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही. मी मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये डॉ. बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिले असेल पण एवढे कशासाठी? हे मला काही समजत नाही, असं त्यांनी म्हटले होते.

तक्रार दाखल होणार का?

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) जात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतल्याचे समजते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शविला होता.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Passes Away : अजित पवारांच्या विमान अपघाताचा थरारक CCTV...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे आणि खंबीर नेतृत्व हरपले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये भीषण...