Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon Mayor Reservation : माजी आमदार शेख महापौर पदासाठी अनुभवी की नवीन...

Malegaon Mayor Reservation : माजी आमदार शेख महापौर पदासाठी अनुभवी की नवीन चेहऱ्याला संधी देणार?

कुणाच्या गळ्यात पडणार माळ

मालेगाव | Malegaon

राज्यातील २९ महापालिकांसाठी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) मंत्रालयात महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिकेचे महापौरपद (Mayor Post) सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुले झाले आहे. यातील मालेगाव महापालिकेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय पक्षांची आकडे जुळवण्यासाठी धावाधाव सुरु आहे. तसेच महापौरपदाच्या उमेदवारचे नाव निश्चित करण्यासाठी आणि पुढील रणनीती आखण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

मालेगाव महापालिकेच्या (Malegaon NMC) एकूण २१ प्रभागांत ८४ जागा असून, बहुमतासाठी ४३ जागांची आवश्यकता आहे. गुरुवार (दि.१५) रोजी मालेगाव महापालिकेची एक जागा बिनविरोध झाल्याने ८३ जागांसाठी पक्ष व अपक्ष असे एकूण ३०१ उमेदवारांसाठी ६४.८ टक्के मतदान झाले होते. यानंतर शुक्रवार (दि.१६ ) रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असता त्यात इस्लाम पार्टीने सर्वाधिक ३५ जागा जिंकल्या होत्या. तर शिंदेंच्या शिवसेनेला १८, एमआयएम २१, भाजप ०२, समाजवादी पक्ष ०५ आणि काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला होता.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

यानंतर आज (गुरूवारी) आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी काही प्रमुख नावे समोर आली आहेत. मालेगावच्या महापौरपदासाठी इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्या आई माजी महापौर ताहेरा शेख रशीद यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. तसेच आसिफ शेख यांचे बंधू खालीद हाजी यांच्या पत्नी नसरीन बानो यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. याबरोबरच समाजवादी पार्टीच्या महानगरप्रमुख शानेहिंद निहाल अहमद यांचेही नाव महापौरपदासाठी पुढे आले आहे.

हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेत महापौर निवडीसह सत्ता स्थापनेसाठी इस्लाम-समाजवादी सेक्युलर फ्रंटकडे काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या सहाय्याने बहुमतासाठी आवश्यक ४३ चे संख्याबळ झाले आहे. तरी इतर पक्षांनी पुढे येत शहराच्या विकासात सर्व पक्षांची हिस्सेदारी व सहकार्य असावे या दृष्टीकोनातून सर्वांनी इस्लामचा महापौर बिनविरोध निवडून देण्याची गरज आहे, असे माजी आमदार आसिफ शेख (Asif Sheikh) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....