Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यातील वांगणसुळे येथील ७६ वर्षीय महिलेचा ठसका येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.भीमाबाई पांडुरंग टोपले असे मृत्यू (Death) झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : आमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

याबाबत अधिक माहिती अशी की, टोपले या शुक्रवार (दि.३०) रोजी दैनंदिन कामानुसार दिवसभर घरातील काम आटोपून संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास आपल्या कुटूंबासाठी स्वयंपाक करून ठेवला होता.यावेळी टोपले यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास स्वत:सह आपल्या पतीसाठी (Husbend) जेवणाचे ताट वाढले. दोघे पती-पत्नी जेवत असताना भिमाबाई यांना जोराचा ठसका लागला व त्या जागेवरच धडपडू लागल्या.

हे देखील वाचा : धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या

यानंतर पतीने जवळ असलेल्या चुलत मुलाला हाक मारली असता तो पळत त्याठिकाणी आला. त्यानंतर
चुलत मुलाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या भिमाबाई यांना आपल्या खांद्यावर टाकून गावामध्ये आणले. त्यानंतर गावामधून खाजगी वाहनाने जवळच असलेल्या पळसण येथील खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले. मात्र, येथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे हलविण्यात आले.

हे देखील वाचा : आमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

त्याठिकाणी डॉक्टरांनी भिमाबाई यांची तपासणी केली असता त्यांना ऑक्सिजन दिले व महिलेची प्रकृती फारच गंभीर असल्याने त्यांना रुग्णवाहिकेने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. याठिकाणी उपचार सुरू असतानाच शनिवार (दि ३१) रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर सकाळी ७ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या